spot_img
spot_img
spot_img

बनावट ट्रॅफिक दंड मेसेजद्वारे १.८६ लाखांची ऑनलाईन फसवणूक; सांगवीत गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: युनूस खतीब

पिंपरी : ट्रॅफिक दंडाच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून एका नागरिकाची तब्बल १ लाख ८६ हजार ४४२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना पिंपळे निलख परिसरात उघडकीस आली आहे.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.१८ ते २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.१४ या कालावधीत फ्लॅट क्रमांक १४०४, सी-विंग, ६६ अव्हेन्यू, पिंपळे निलख येथे राहणाऱ्या एका पुरुष फिर्यादीच्या मोबाईलवर हा प्रकार घडला.

फिर्यादीच्या आयफोन १३ मोबाईलमध्ये असलेल्या एअरटेल सिम क्रमांक ९७४८३२५३६३ वर ९८६४२४१८६० या नंबरवरून “Compulsory Traffic Fine Reminder: Non-Compliance will trigger license cancellation & further legal consequences. Settle immediately!” असा मेसेज आला होता.

मेसेजमधील https://echaix.vip/in या लिंकवर क्लिक केल्यानंतर फिर्यादीला ट्रॅफिक पोलिसांचा ५०० रुपयांचा दंड असल्याचे दिसले. दंड भरण्यासाठी ‘Proceed’ या बटणावर क्लिक करताच, अचानक दंडाची रक्कम ५०० रुपयांवरून थेट १,८६,४४२ रुपये इतकी दाखवली गेली व फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरून ही संपूर्ण रक्कम ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीने काढून घेण्यात आली.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९/२०२६ नोंदवण्यात आला असून अज्ञात आरोपीविरुद्ध बी.एन.एस. कलम ३१६(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नांदेकर करत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी नागरिकांना अशा बनावट लिंक, एसएमएस व ई-मेलपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही शंका असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!