spot_img
spot_img
spot_img

मोशीतील स्पामध्ये देहव्यापार; भोसरी एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई, स्पा मॅनेजर अटक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: युनूस खतीब

पिंपरी : मोशी प्राधिकरण परिसरातील स्पा सेंटरच्या आड देहव्यापार चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत स्पा मॅनेजरला अटक केली आहे.

या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.१६ वाजण्याच्या सुमारास स्पाईन सिटी मॉल, सेक्टर क्रमांक ९, मोशी प्राधिकरण येथील आरंभ स्पा (शॉप नं. ७४, पहिला मजला, ए बिल्डींग) येथे छापा टाकण्यात आला.

ही कारवाई दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३.३८ वाजेपर्यंत सुरू होती.

या कारवाईत राज संतोष जयस्वाल (वय २४, व्यवसाय – स्पा मॅनेजर, रा. कोंढवा खुर्द, पुणे) यास अटक करण्यात आली आहे. तसेच अंदाजे ४५ वर्षे वयाची महिला आरोपी (रा. मुंबई, स्पा चालक) फरार असून तिचा शोध सुरू आहे.

आरोपींनी स्पा सेंटरच्या नावाखाली दोन पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या माध्यमातून मिळालेल्या रकमेतून आरोपी स्वतःची उपजीविका भागवत असल्याचेही स्पष्ट झाले.

कारवाईदरम्यान घटनास्थळावरून सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, सदर स्पा सेंटरच्या आसपास दंतचिकित्सा दवाखाना, आयुष स्पेशालिटी क्लिनिक तसेच स्त्रीरोग व प्रसूती तज्ञांचे क्लिनिक यांसारखी सार्वजनिक व वैद्यकीय ठिकाणे असतानाही आरोपींनी निर्ढावलेपणाने देहव्यापार सुरू ठेवला होता.

या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११५/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुनील जगन्नाथ शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून अशा बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!