spot_img
spot_img
spot_img

शाहूनगरात माय मराठीचा जागर…… मराठी भाषा गौरव दिनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाहूनगर – संभाजीनगर रस्त्यावरील शिव-शाहू-संभाजी उद्यानामध्ये आयोजित विविध कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत माय मराठीचा जागर केला.
या प्रसंगी मान्यवर कवींचे “माय मराठी” कविसंमेलन, “नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार” आणि “निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव समारंभ” आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी भाषेचा अभिमान जागवणारा हा सोहळा साहित्यप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला.
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संगीता झिंजुरके (पाठ्यपुस्तकातील कवयित्री) होत्या. तर प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, विलास जेऊरकर,यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष बालकिसन मुत्याल यांनी केले.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक तुषारभाऊ हिंगे, अनुराधाताई गोरखे, सुप्रिया ताई चांदगुडे, कुशाग्र कदम यांचा सत्कार करण्यात आला.
कविसंमेलनामध्ये प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, मानसी चिटणीस, प्रदीप गांधलीकर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, सीमा गांधी, सुहास घुमरे, पितांबर लोहार, कांचन नेवे, सुनंदा शिंगनाथ, रेणुका हजारे आदी कवींनी काव्याच्या विविध प्रकारामधून मराठी भाषेची महती सांगितली. संग्राम उदय पाटील या विद्यार्थ्याने मराठी भाषेचा पोवाडा सादर केला.
“मराठी भाषा गौरव दिना निमित्त” घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!