spot_img
spot_img
spot_img

डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये टॉप ५ शहरांमध्ये पुण्याचा समावेश : वर्ल्डलाईन इंडिया

शबनम न्यूज | पुणे

देशात होणाऱ्या डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये आकारमान (व्हॉल्यूम) आणि मूल्य (व्हॅल्यू) या दोन्ही बाबतीत पुणे शहराने सर्वोच्च पाच शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. डिजिटल पेमेंटच्या एकूण व्यवहारांमध्ये पुणे शहराचा वाटा ११ टक्के असून तो २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत ८ टक्के होता. तसेच एकूण व्यवहार मूल्यामध्ये पुणे शहराचा वाटा १० टक्के असून त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्के ची लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

पेमेंट सेवांमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या वर्ल्डलाईन या कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ च्या सहामाहीत (जुलै-डिसेंबर २०२४) त्यांच्याद्वारे प्रक्रिया केलेल्या डिजिटल व्यवहारांचा नवीनतम अहवाल प्रकाशित केला. यामध्ये भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या पेमेंट इकोसिस्टममधील प्रमुख ट्रेंड मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.

सर्वाधिक डिजिटल व्यवहार असलेल्या टॉप ५ शहरांमध्ये बेंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे.

वर्ल्डलाईन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नरसिंहन म्हणाले, “डिजिटल व्यवहारांच्या संदर्भात भारतातील पहिल्या पाच शहरांमध्ये पुण्याला स्थान मिळाल्यामुळे त्याचे डिजिटल योगदान उठून दिसत आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेला त्यांनी जलदपणे स्वीकारले आहे हे त्यातून प्रतिबिंबित होत आहे. शहरातील गतिमान डिजिटल व्यवस्थेवर या टप्प्यामुळे प्रकाश पडत असून तंत्रकुशल लोक, भरभराटीला येत असलेले फिनटेक (अर्थ-तंत्रज्ञान) वातावरण आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा यांमुळे त्यांना चालना मिळत आहे. वर्ल्डलाईनमध्ये आम्ही व्यवसाय आणि ग्राहकांना दोन्ही सक्षम करणाऱ्या सुरक्षित, नाविन्यपूर्ण आणि समावेशक पेमेंट सोल्यूशन्सद्वारे या परिवर्तनाला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

प्रमुख ग्राहक ट्रेंड

दुकानातील खरेदी बळकट राहिली आणि त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खालील व्यापारी श्रेणींचा समावेश होता :
· किराणा दुकाने
· रेस्टॉरंट्स
· सेवा केंद्रे
· कपड्यांची दुकाने
· सरकारी सेवा
· औषध दुकाने आणि रुग्णालये

या श्रेणींचा एकूण इन-स्टोअर व्यवहारांमध्ये वाटा अंदाजे ६८ टक्के आणि एकूण मूल्यामध्ये ५३ टक्के होता.

ऑनलाईन व्यवहारांना खालील गोष्टींनी चालना मिळाली :
· ई-कॉमर्स
· गेमिंग
· उपयुक्तता बिलांची देयके
· सरकारी सेवा
· आर्थिक सेवा
या वर्गांचा एकूण ऑनलाईन व्यवहारांमध्ये ८१ टक्के आणि मूल्यामध्ये ७४ टक्के वाटा होता

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!