spot_img
spot_img
spot_img

रक्षक चौक उड्डाणपूल व अंडरपास अंतिम टप्प्यात; वाहतूक कोंडीवर मिळणार दिलासा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २६ (विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड) येथील रक्षक चौकातील उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) व अंडरपासचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. नुकतीच त्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून प्रगतीचा आढावा घेतला.

सिग्नलमुक्त आणि वेगवान वाहतूक

उड्डाणपूल आणि अंडरपास पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक सिग्नलमुक्त होऊन अधिक सुरळीत होणार आहे.

  • औंध ते रावेत मार्गावरील प्रवास अधिक जलद व सुलभ होईल.

  • वाकड फाटा ते औंध दरम्यान वाहनांचा वेळ वाचणार आहे.

  • पिंपळे निलखहून पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

या प्रकल्पामुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांची शक्यताही घटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लवकरच नागरिकांसाठी खुला

पाहणीदरम्यान आमदार जगताप यांनी उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करून पूल नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी नगरसेविका आरतीताई चोंधे, स्नेहाताई कलाटे, नगरसेवक विनायकदादा गायकवाड, संदीपअण्णा कस्पटे, भाजप नेते सचिनभाऊ साठे तसेच शहर अभियंता प्रेरणा सिंकर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, उपअभियंता निलेश दाते आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!