शबनम न्यूज | प्रतिनिधी
आकुर्डी: सरस्वती प्राथमिक, माध्यमिक विद्यालय आकुर्डी,पुणे ३५ या शाळेत,मराठी राजभाषा गौरव दिन संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.गोविंदराव दाभाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय परिसरामध्ये लेझीम पथकासह ग्रंथदिंडी काढण्यात आली.
शाळेमध्ये मराठी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना उभे,निवेदन प्रतिमा काळे यांनी केले. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त इयत्ता चौथी ते सातवीच्या मुलांनी कवी, लेखक कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती आपल्या भाषणातून दिली तसेच मराठी भाषेवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
मानसी मेटांगे या विद्यार्थिनीने मराठी भाषेवर आधारित प्रश्न विचारले . शाळेतील शिक्षक कैलास कोशिरे यांनी वामनदादा कर्डक यांचे लिखित ‘माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का’ हे लोकप्रिय गीत सादर केले. प्रतिमा काळे यांनी शिक्षक मनोगतात कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती दिली तसेच स्वरचित ‘भाषा मराठी साजिरी’ कविता सादर केली. इयत्ता सातवी मधील विद्यार्थी श्रीयश गायकवाड याने मराठी भाषेबद्दल भाषण केले ,आर्यन कसबे या विद्यार्थ्याने ‘अरे खोप्यामध्ये खोपा’ ही कविता सादर केली. संगीत शिक्षक प्रकाश कोळप यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गीत सादर करून उपस्थित मान्यवराचे आभार मानले.सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत चव्हाण,चतुर आखाडे, अविनाश आखाडे ,सविता पाटील,नयना पाटील, सुकन्या जाधव यांनी केले होते.


