spot_img
spot_img
spot_img

थेरगावमध्ये अनधिकृत पार्किंगविरोधात कारवाई करा – विशाल बारणे

‘नो पार्किंग’ फलक लावण्याची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर वाढत्या अनधिकृत पार्किंगविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवानेते विशाल नंदूशेठ बारणे यांनी कारवाईची मागणी केली आहे. सांगवी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देत संबंधित वाहनधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी तसेच ‘नो पार्किंग’चे फलक लावून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली.

मोरू बारणे मैदान ते शंकर गावडे कामगार भवन तसेच अक्षय चंदन सोसायटीपासून बारणे कॉर्नर आणि बटरफ्लाय ब्रिजपर्यंतच्या सार्वजनिक रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात खासगी कार व बसचे अनधिकृत पार्किंग होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताची शक्यता, पादचाऱ्यांना होणारी गैरसोय तसेच आपत्कालीन वाहनांना अडथळा निर्माण होण्यासारख्या गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून ही समस्या तीव्र झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील वाहनधारकांवर कठोर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत आणि कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ‘नो पार्किंग’चे फलक तातडीने उभारावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या मागणीमुळे आता वाहतूक विभाग काय पावले उचलतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!