spot_img
spot_img
spot_img

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘लोकसेवेचा लोकजागर’ ग्रंथाचे प्रकाशन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत विधानभवन, मुंबई येथे वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राद्वारे संकलित व संपादित ‘लोकसेवेचा लोकजागर’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याच्या संसदीय परंपरा, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि लोकसेवेचा व्यापक दृष्टीकोन यावर आधारित हा ग्रंथ असून, लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी तो मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे तसेच मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करण्यात आला. राज्याच्या प्रशासनात व विधिमंडळीन कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!