spot_img
spot_img
spot_img

प्रभाग क्र. १२ मधील पाणीपुरवठा सुरळीत करा – नगरसेविका शीतल वर्णेकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांना नियमित व वेळेवर पाणीपुरवठा मिळावा यासाठी नगरसेविका शीतल वर्णेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे अधिकृत निवेदन सादर केले. महापौर रवी लांडगे तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांना हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग १२ मधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याच्या तसेच पाण्याचा दाब कमी असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत. यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर समस्येची तात्काळ दखल घेऊन प्रभागात नियमित, पुरेसा व निश्चित वेळेनुसार पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!