spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये डासांवर आळा घालण्यासाठी तात्काळ औषध फवारणी!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या कीटकनाशक विभागाच्या समन्वयाने प्रभागातील परिसरात तात्काळ औषध फवारणी करण्यात आली. नागरिकांच्या मागणीनुसार ही कारवाई करण्यात आली असून वाढत्या डास व कीटक प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवली.

अलीकडे परिसरात डासांची संख्या वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्यानुसार संपूर्ण भागात प्रभावीपणे फवारणी करून स्वच्छता राखण्याबाबत तसेच पाण्याचे साचलेले ठिकाण टाळण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

याबाबत बोलताना नगरसेवक सागर कोकणे म्हणाले, “नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच आमची प्राथमिकता आहे. भविष्यातही अशा तक्रारींवर त्वरित दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.”

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, महापालिकेच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!