spot_img
spot_img
spot_img

तळेगाव दाभाडेत अनैतिक व्यवसायविरोधी कारवाई; एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे परिसरात अनैतिक व्यवसाय केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे–मुंबई हायवेवरील सीआरपीएफ गेट क्रमांक ३ समोरील झाडाखाली करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ६१/२०२६ अन्वये अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी उदयकुमार बालासाहेब भोसले (वय ३१), हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात कार्यरत आहेत.

तपासात असे आढळून आले की, आरोपी महिला जॉली गौतम विश्वास (वय ३२, सध्या वास्तव्यास – बुधवार पेठ, पुणे; मूळ रा. पश्चिम बंगाल) ही सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने अश्लील हावभाव करत ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करत होती.

तिच्या कृत्यामुळे सार्वजनिक शिस्त व सुव्यवस्थेचा भंग होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या गैरकृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!