शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशी येथील नागेश्वर कॉलनीत कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकेत नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास भारत माता चौकाजवळील नागेश्वर कॉलनी, घर नं. ०१ येथे ही घटना घडली.
फिर्यादी जयश्री भगवान मिसाळ (वय ५५, व्यवसाय – घरकाम, रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) या घरी असताना शेजारी राहणारे आरोपी गुरुनाथ जाधव (वय ५०) व श्रीदेवी गुरुनाथ जाधव (वय ३८) तसेच त्यांचा अल्पवयीन मुलगा यांनी कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद घातला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या बहिणी विजयाआणि प्रेमिला यांनाही मारहाण करण्यात आली.
यामध्ये प्रेमिला यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेत तिघींनाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), ३२८(४), ३५२, ३(१) तसेच भादवी कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.


