शबनम न्यूज | प्रतिनिधी
तळेगाव–चाकण महामार्गावर भरधाव टेम्पोने धडक दिल्याने एका अज्ञात युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालक अद्याप फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता सुमनसार मराठा क्रांती चौकाजवळ, चाकण–तळेगाव हायवे रोडवर नवी भाजी मंडईसमोर ही घटना घडली.
आरोपीने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा टेम्पो (क्रमांक MH 04 EB 3344) हा निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवत रस्ता ओलांडत असलेल्या अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या अज्ञात पुरुषाला जोराची धडक दिली.
या अपघातात संबंधित युवकास गंभीर दुखापत झाली असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.


