spot_img
spot_img
spot_img

बनावट गॅस विक्रीचा पर्दाफाश चाकणमध्ये आरोपी अटकेत

घरगुती वापराच्या नावाखाली जीवघेणा धोका; स्वस्त गॅस विक्रीतून नागरिकांची फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 चाकण परिसरात घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅसच्या नावाखाली बेकायदेशीर व धोकादायक गॅस विक्री करून नागरिकांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५/०२/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता चाकण–तळेगाव रोडवरील रानुबाई मळा परिसरात निलेश जाधव यांच्या गाळ्यामध्ये ही कारवाई करण्यात आली.

फिर्यादी योगेश्वर आंवडकर कोठेकर (वय ३२, पो. हवा. क्र. १२६९, उत्तर चाकण पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय) यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी दत्ता जानोबा कोकरे (वय २४, रा. निलेश जाधव यांच्या भाड्याच्या खोलीत, रानुबाई मळा, चाकण) हा घरगुती वापरासाठी लागणाऱ्या ज्वलनशील गॅसचा बेकायदेशीर साठा करून तो ग्राहकांना विक्री करत होता.

वापरात असलेल्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरून प्रत्येकी सुमारे ७५०० रुपयांना विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले.

ही गॅस विक्री कोणतीही परवानगी नसताना, अत्यंत धोकादायक पद्धतीने केली जात होती.

त्यामुळे स्फोट, आग लागणे किंवा जीवितहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकत होता.

आरोपीने या ज्वलनशील वस्तूंबाबत शासन व ग्राहकांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), २८७ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह आवश्यक वस्तू (पुरवठा व वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३, ४, ५, ६, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.उपनि. मोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरगुती गॅस किंवा इतर ज्वलनशील वस्तू केवळ अधिकृत वितरकांकडूनच खरेदी कराव्यात व संशयास्पद विक्रीबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!