spot_img
spot_img
spot_img

भोसरीत इंटरनेट केबल व्यावसायिकावर हल्ला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोसरी एमआयडीसी परिसरात इंटरनेट केबल व्यावसायिकावर मारहाण करून रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास नाशिक–पुणे महामार्गालगत असलेल्या सुपरसाईन वाईन किंग नावाच्या दुकानासमोर ही घटना घडली.

फिर्यादी संदीप रामचंद्र गुंजाळ (वय ४३, व्यवसाय – इंटरनेट केबल सेवा, रा. सर्वे नं. ४३, वडार वस्ती, साईबाबा मंदिर पाठीमागे, कर्वेनगर, पुणे) हे आपल्या मित्रांसह तेथे उभे असताना आरोपी अमोल ज्ञानेश्वर शिंदे (वय अंदाजे ३५, रा. कर्वेनगर, पुणे) याने त्यांच्याशी वाद घातला.

तक्रारीनुसार, इंटरनेट केबलच्या कामासाठी तसेच सीएनजी भरण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून आरोपीने रागाच्या भरात फिर्यादीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला व तो खाली आपटून नुकसान केले. त्यानंतर दुकानासमोरच फिर्यादीस खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

या हल्ल्यात फिर्यादीच्या पॅंटच्या खिशातील सुमारे ८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले.

या मारहाणीत फिर्यादीच्या छातीच्या दोन बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.४० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!