शबनम न्यूज | प्रतिनिधी
काळेवाडी परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गुन्हे शाखा युनिट–२, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे.
या कारवाईत एकूण १३ ग्रॅम गांजा व २६.७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा सुमारे २ लाख ६५ हजार ३५० रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.०५ वाजण्याच्या सुमारास रागा हॉटेलच्या विरुद्ध बाजूस, हॉटेल पाटीलवाड्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
१) प्रतीक राकेश खेरनार (वय २७, रा. हिंजवडी),
२) मयूर घनश्याम कपाटे (वय २५, रा. अशोकनगर, पिंपरी)
३) अक्षय विजय मंथान (वय २८, रा. पिंपरीगाव)
यांचा समावेश आहे.
पोलिस तपासात आरोपी क्र. १ कडे १३ ग्रॅम निळकट गांजा (किंमत ६,४५० रुपये), आरोपी क्र. २ कडे ३.३० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (किंमत ३०,३०० रुपये) तर आरोपी क्र. ३ कडे २३.४० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (किंमत २,३०,४०० रुपये) आढळून आला. हा अमली पदार्थ अनधिकृत व बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
सदर कारवाई पोलीस शिपाई रवि प्रकाश पवार यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
अमली पदार्थ विक्रीच्या साखळीचा तपास करून आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


