spot_img
spot_img
spot_img

महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांचा अर्ज दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अभिषेक बारणे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला. या प्रसंगी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, मा. महापौर नितीन काळजे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक उत्तम केंदळे, राजू मिसाळ, कुशाग्र कदम, नगरसेविका मनिषा पवार तसेच बाबासाहेब त्रिभूवन आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.

स्थायी समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य संख्याबळात आघाडीवर असल्याने अभिषेक बारणे यांची अध्यक्षपदी नियुक्ती निश्चित मानली जात आहे. त्याबाबतची औपचारिक घोषणा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!