spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षपदासाठी सुजाता बोराटे यांचा अर्ज दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. सुजाता बोराटे यांनी आज अधिकृतपणे नामनिर्देशन अर्ज दाखल केला. या प्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, उपमहापौर मा. शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, महापौर नितीन काळजे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक उत्तम केंदळे, राजू मिसाळ, कुशाग्र कदम, सौ. मनिषा पवार, बाबासाहेब त्रिभूवन,ज्ञानेश्वर जगताप तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.

विधी समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य संख्याबळात आघाडीवर असल्याने सौ. सुजाता बोराटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. याबाबतची औपचारिक घोषणा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

विधी समिती अध्यक्षपदासाठी सौ. सुजाता बोराटे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने शहरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!