spot_img
spot_img
spot_img

थेरगावच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

केंद्रीय शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र परीक्षा परिषेद यांच्या वतीने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत पीएम श्री माध्यमिक विद्यालय थेरगाव येथील पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने आयोजित केली जाते. राज्यभरातून हजारो विद्यार्थी या स्पर्धात्मक परीक्षेला बसतात. अशा कठीण परीक्षेत विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेले सोनकांबळे संस्कार राहुल, वैध अमित दीपक, नाटेकर महांतेश चंद्रकांत, गायकवाड साई विजयकुमार, जाधव साईनाथ बालाजी यांनी उत्तीर्ण होत मोठे यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत, “ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे फळ आहे,” असे सांगितले. पर्यवेक्षक श्रीमती हर्षदा राऊत तसेच NMMS विभाग प्रमुख श्री. विद्यानंद सावंत यांनी विद्यार्थ्यांना योग्य नियोजन, सराव चाचण्या आणि वैयक्तिक मार्गदर्शन दिल्यामुळे हे यश शक्य झाल्याचे नमूद केले.

यावेळी श्रीमती मंगल आव्हाड, श्रीमती सुप्रिया तुपे, श्रीमती माधुरी सायखेडे, श्रीमती सोनाली जाधव, श्री. बालाजी जगताप, श्रीमती हर्षला कळंबे, श्रीमती नेहा जाधव आणि श्री. मंगेश मुंढे यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या या यशामुळे थेरगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून पालक व नागरिकांकडूनही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांकडे प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!