spot_img
spot_img
spot_img

एमआयडीसी भोसरीत वादातून मारहाण; तरुण जखमी, दोन आरोपींवर गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

शिवीगाळ केल्याच्या संशयावरून घरी बोलावून तरुणाला मारहाण केल्याची घटना बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडली आहे.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

ही घटना २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. फिर्यादी श्रावण वसंत गव्हाणे (वय ३०, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. नतारा कॉलनी, सदगुरुनगर, भोसरी) यांना आरोपी भरत भुजींग मोहीते यांनी बालाजीनगर येथील घरी बोलावून “तु मला शिवीगाळ का केलीस?” असे म्हणत हाताने मारहाण केली.

यावेळी आरोपीचा मित्र नरेश रामु विटकर याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यावर, गालावर व छातीवर मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२), ३४१, १८(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार लांघी करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!