spot_img
spot_img
spot_img

दिघीत सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव; अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

सार्वजनिक रस्त्यालगत फुटपाथवर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना शब्दोच्चार, डोळ्यांच्या खुणा व लैंगिक हावभाव करून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३५ वाजता दिघी येथील योगीराज चौक ते चाकण चौक रस्त्यावर, श्री गुरु देहुकर महाराज फड, श्री क्षेत्र आळंदी येथील लोखंडी कमानीजवळील पत्र्याच्या कंपाऊंडलगत सार्वजनिक रोडच्या बाजूच्या फुटपाथवर करण्यात आली.

तक्रार गणेश सिताराम कारोटे (पो.हवा. 1768, नेमणूक – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पिंपरी-चिंचवड) यांनी दिली आहे.

तक्रारीनुसार, महिला आरोपी केसर विनायक लगस (वय ४३, रा. माऊली पार्क, चऱ्होली बायपास, पुणे) हिने वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी शब्दोच्चार करून, डोळ्यांनी खुणा देऊन व हाताने लैंगिक हावभाव करून नागरिकांना अडथळा निर्माण केला.

या कृत्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाणे येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सध्या अटकपूर्व असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रहाणे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!