spot_img
spot_img
spot_img

चिंचवड मध्ये गांजा विक्रीप्रकरणी एकास अटक

शबनम न्यूज | पिंपरी

गांजा विक्रीप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २२) दुपारी अजंठानगर, चिंचवड येथे करण्यात आली.

धनंजय शिवाजी देसाई (५२, रा. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार मितेश यादव यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजंठानगर येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी कारवाई करत धनंजय देसाई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३१ हजार ५०० रुपये किमतीचा ११० ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोबाइल फोन जप्त केला.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!