शबनम न्यूज | पिंपरी
पादचारी तरुणाला विनाकारण मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (२२ एप्रिल) मध्यरात्री मोरेवस्ती, चिखली येथे घडली.
प्रेम अंबादास मिसाळ (१९, रा. वाघोली, पुणे) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ठिचक्या उर्फ प्रेम देवरे (रा. चिखली) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेम यांचे मामा मोरेवस्ती चिखली येथे राहतात. मंगळवारी रात्री ते पायी चालत मामाच्या घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात मद्यपी संशयिताने प्रेम यांना अडवले. तु कुठून आला आहे, असे विचारले. तुला काय करायचे आहे, असे म्हणत प्रेम यांनी संशयिताला विरोध केला. त्याचा राग येऊन त्याने प्रेम यांना फुटलेल्या काचेच्या बाटलीने मारून जखमी केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.