spot_img
spot_img
spot_img

डुडुळगाव येथील सोसायटीत कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

डुडुळगाव येथील यशदा सुप्रीम सोसायटी परिसरात कचरा टाकण्याच्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११९ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास यशदा सुप्रीम सोसायटी, फेज वन, डुडुळगाव, पुणे येथील सोसायटीच्या सी व बी विंगजवळील ड्राईव्हवे येथे घडली. फिर्यादी अक्षय अरुण मोरे (वय ३४, व्यवसाय नोकरी, रा. फ्लॅट नं. सी–१३०१, यशदा सुप्रीम सोसायटी) हे ठिकाणी उपस्थित असताना आरोपींनी सोसायटीतील कचरा कचऱ्याच्या डब्यामध्ये न टाकता ड्राईव्हवेमध्ये फेकू नका, असे सांगितल्याच्या रागातून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली.

आरोपींनी फिर्यादीस हाताबुक्यांनी चेहरा व पाठीत तसेच उजव्या हातावर व पंजावर मारहाण केली.

या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताच्या तर्जनी बोटाला दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्यावर प्रथम साईनाथ हॉस्पिटल, मोशी येथे व पुढे वायसीएम हॉस्पिटल, पिंपरी येथे उपचार करण्यात आले.

वैद्यकीय तपासणीत उजव्या हाताच्या तर्जनी बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात आरोपी अक्षय मोरे, दिलीप वांडकर व शुभम वांडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक आरोपी अद्याप अटकेत नसल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंगारे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!