spot_img
spot_img
spot_img

पवळेवस्ती येथे पाण्याच्या वादातून महिला व मुलावर मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता पवळेवस्ती, ता. खेड, जि. पुणे येथे घडली. महिला फिर्यादी व त्यांचा मुलगा सार्थक हे आपल्या शेतातील मुळे धुण्यासाठी पाण्याची मोटार सुरू करत असताना, आरोपी क्रमांक १ सर्जेराव दामोदर पवळे यांनी “आज शेतीला पाणी भरण्याची पाळी माझी आहे” असे म्हणत मोटार बंद केली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलाला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.

याच वेळी आरोपी क्रमांक २ हिम्मतराव दामोदर पवळे यांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला गंभीर दुखापत झाली. तर मुलगा सार्थक याच्या डाव्या हाताच्या कोपरावर, डाव्या हातावर तसेच डोक्याच्या मागील बाजूस मुकामार लागल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणात दोन्ही आरोपींना बीएनएसएस कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!