spot_img
spot_img
spot_img

भोसरीत भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, अज्ञात टेम्पो व ट्रकचालकावर गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोसरी एमआयडीसी परिसरातील इंद्रायणी नगर येथील एचपी पेट्रोल पंपासमोरील हॉटेल टीप टॉप चौकात सोमवारी (दि.२२ फेब्रुवारी २०२६) सकाळी सुमारे १०.४५ वाजता झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यश अनिल कोटावले (वय २१, रा. सदगुरु नगर, भोसरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ विशाल अनिल कोटावले (वय १९) सकाळी घरातून कामावर जात असताना इंद्रायणी कॉर्नरकडून आलेल्या अज्ञात पांढऱ्या रंगाच्या छोट्या टेम्पोने हॉटेल टीप टॉप चौकातून उजवीकडे वळण घेत समोरून त्याच्या दुचाकीला घासले.

अपघात टाळण्याच्या प्रयत्नात विशालची दुचाकी चौकातच रस्त्याच्या कडेला ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या ट्रक (क्र. एमएच १४ जीसी २४६०) च्या मागील बाजूस धडकली.

यात विशाल खाली पडून गंभीर जखमी झाला व उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अज्ञात पांढऱ्या रंगाच्या छोट्या टेम्पोचा चालक तसेच ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या असलेल्या ट्रकचा चालक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६, २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दोन्ही आरोपी सध्या अटक न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!