शबनम न्यूज | प्रतिनिधी
किवळे जय श्रीराम चौक शिवशंभो कॉलनी आदर्श नगर येथे सालाबाद प्रमाणे यावर्षीही शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी भक्ती शक्ती येथून शिवज्योत आणण्यात आली त्यानंतर स्थानिक महिला – भगिनींच्या हस्ते शिवजन्माचा पाळणा संपन्न होणार झाला, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जिजाऊ वंदनेने शिवजयंतीची सुरुवात करण्यात आली. तदनंतर परिसरातील लहान मुलांचे शिवराया वरती पोवाडे व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. व तसेच सायंकाळी सात ते साडेनऊ या वेळेत आदर्श नगर परिसरातील 700 पेक्षा जास्त लोकांनी या व्याख्यानाला हजेरी लावली आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत उपस्थिती दाखवली. या व्याख्यान प्रसंगी शिवचरित्रकार प्रा. विक्रम कदम सर यांनी *कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन-संघर्ष समजावून सांगितला, शिव चरित्रातून आज आपण काय शिकावे ? तरुणांनी निर्व्यसनी रहावे, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार करत असताना शिवबा कधीही स्त्री अभिलाषा धरू नये, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता असते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्माच्या व शत्रूच्याही स्त्रियांना बहिणी समान मानले ,औरंगजेबाच्या शत्रू च्या पदरी असलेला इतिहासकार खापी खान छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना असे लिहितो शिवाजी राजा म्हणजे नीतिमान आणि सर्वगुणसंपन्न राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय ,बहीण भावाचे जसे नाते असते तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे व महिला भगिनींचे असते, मुलगा आणि आईचा संवाद जसा असतो तसाच संवाद स्वराज्यातील स्त्रिया सोबत व शत्रूच्या स्त्रिया सोबत सुद्धा असाच व्यवहार ठेवणारा जगातील अद्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.*पण आजचे राज्यकर्ते/उद्योगपती तसे राहिले नाहीत.
जाफरी एपिस्टीन फाईल अमेरिकेत उघड झाली च्या चर्चा बाहेर आल्या आहेत. एपिस्टीन फाईल शी संबंधित भारतातील मोठे उद्योगपती व मोठे राजकारणी नेते यांचाही संबंध असल्याच्या चर्चा ऐकण्यात येत आहेत, त्या फाईल मधून निदर्शनास लहान लहान१२ ते १६ वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार झालेला आहे. विकृतीचा कळस या लोकांनी गाठला आहे. भारताच्या पृथ्वीतलावर इतके क्रूर कर्मा राज्यकर्ते आणि उद्योगपती झाले आहेत. याचं कारण त्यांना शिवचरित्राचा विसर पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेसातशे वर्ष गुलाम असलेला प्रदेश “स्वराज्य ” या संकल्पनेने स्वातंत्र्य केला आणि आई जशी लहान मुलांना सांभाळते त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला जपले सांभाळले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या दीडशे वर्षात पुन्हा आपला भारत देश इंग्रजांचा गुलाम झाला याचे कारण छत्रपतींच्या वंशज्यांना, छत्रपतीच्या अनुयायांना शिवचरित्राचा विसर पडला त्याचा परिणाम पुन्हा आपण गुलाम झालो. म्हणून बांधवांनो छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास करणे चरित्राचे वाचन करणे आत्मसात करणे व स्वीकारणे ही आपली जबाबदारी आहे , छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिवस किंवा स्मृतिदिन हा प्रबोधनl दिवस म्हणून साजरे केले पाहिजे असे आवाहन इतिहासाचे गाडे अभ्यासक शिवचरित्रकार प्राध्यापक विक्रम कदम यांनी केले .
या दैदिप्यमान सोहळ्यासाठी किवळे शहरातील विद्यमान नगरसेवक निलेश भाऊ तरस, ऐश्वर्या ताई राजेंद्र तरस, आयु.धर्मपाल तंतरपाळे, रेश्माताई बापू कातळे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
माजी नगरसेवक मोरेश्वर भाऊ भोंडवे यांनीही सदिच्छा भेट दिली व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील सामाजिक कार्यकर्ते लखनजी तरस, मराठा सेवा संघाचे शाहूराज कदेरे सर, आपणा वतन चे सिद्दिक भाई शेख यांचीही सदिच्छा भेट आणि शुभेच्छा दिल्या,
शिवजयंती महोत्सव समिती किवळे चे शिवजयंती चे आयोजन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश शिंदे पाटील, आदर्श नगर सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष तायप्पा धनगर, कार्याध्यक्ष अरुणजी खेत्री यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्री. सचिन पाटील , राष्ट्रवादी चे श्री चेतन शितोळे ,श्री बसप्पा खेत्री,श्री अमोल विटकर ,
श्री रामदास भाऊ घोटकुले. माजी सैनिक मधुकरराव माने, इत्यादी कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश शिंदे पाटील यांनी केले व सूत्रसंचालन प्रियांकाताई पोळ यांनी केले. तर मान्यवर आणि उपस्थित समाज बांधवांचे आभार फिरोज आलम यांनी मानले.


