spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये गांजाची विक्री करणारा तरुण अटकेत; १४८ ग्रॅम गांजा जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड शहरातील चिंचवड परिसरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाई करत गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून १४८ ग्रॅम वजनाचा, सुमारे ७,४०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पानवाटा, मॅगनेटजवळ, गिरीराज हौसिंग सोसायटी परिसरात करण्यात आली. या प्रकरणी एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कुणाल शिवाजी डोफोडे (वय २६, व्यवसाय – रिक्षाचालक, रा. एकविरानगर, पाण्याच्या टाकीजवळ, गुरुद्वाराचौक, विजयनगर, चिंचवड, पुणे) असे आहे. तो गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो अमली पदार्थ बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सदर कारवाई चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुनील सुरेश बावकर यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून, त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

शहरात अमली पदार्थांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून अशाच प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!