शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड शहरातील भोसरी परिसरात अमली पदार्थविरोधी मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून १०.१२ ग्रॅम एमडी, दोन मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील इंद्रायणी नगर, लांडे नगरजवळील रोडच्या कडेला करण्यात आली. याप्रकरणी एनडीपीएस अॅक्टच्या कलम ८(क), २१(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
१) किसनाराम थानाराम चौधरी (वय ३०)
२) आईदानराम जसराम चौधरी (वय ३६)
(दोघे रा. गोविंदपुरा डाबरा, तहसील बावडी, दानवरा, जिल्हा जोधपूर, राजस्थान) अशी आहेत.
पोलिस तपासात आरोपी हे एमडीची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने ते अमली पदार्थ बाळगत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर कारवाई भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रभाकर हनुमंत खाडे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.
आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू असून, शहरात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


