spot_img
spot_img
spot_img

प्रभागाच्या समस्यांकडे लक्ष वेधत नगरसेविका मनिषा पवार यांनी मांडली ठोस भूमिका!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. या सभेमध्ये प्रभाग क्रमांक 23 मधील विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधत भाजपच्या नगरसेविका मनिषा प्रमोद पवार यांनी ठोस भूमिका मांडली.

प्रभाग क्रमांक 23 मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्या वावरामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच प्रभागात पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दररोज पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना दिवसाआड पाणीपुरवठा होत असून तोही अपुरा असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात मांडली.

यासोबतच प्रभाग क्रमांक 23 संदर्भातील विकास आराखडा रद्द करण्यात यावा, याबाबतही नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत संबंधित विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

प्रभाग क्रमांक 23 मध्ये ड्रेनेज लाईनच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून, वारंवार चोकअप होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना तीव्र त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. अनेक घरांमध्ये सांडपाणी तुंबण्याच्या घटना घडत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. मूलभूत सोयी-सुविधांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देत कायमस्वरूपी तोडगा काढावा, तसेच ड्रेनेज लाईनची दुरुस्ती व साफसफाई नियमितपणे करावी, अशी मागणी मनीषा पवार यांनी केली.

या सभेस महापौर रवी लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह शहरातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग 23 मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!