spot_img
spot_img
spot_img

स्वीकृत सदस्य पदी कैलास बारणे व संभाजी बारणे यांना संधी द्या!

समर्थकांची राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहातील तीन स्वीकृत नामनिर्देशित सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नियुक्त करण्यात येणार आहे. या स्वीकृत सदस्य पदी माजी नगरसेवक कैलास बारणे व राष्ट्रवादीचे नेते संभाजी बारणे यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी कैलास बारणे आणि संभाजी बारणे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक नाना काटे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे एकूण 37 नगरसेवक निवडून आले आहेत यामध्ये आता स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादीला शहरात तीन स्वीकृत नगरसेवक देता येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांची धावपळ सुरू आहे, अशातच थेरगाव परिसरातून राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व करणारे माजी नगरसेवक कैलास बारणे व ज्येष्ठ नेते संभाजी बारणे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असताना त्यांच्या समर्थकांनी या दोघांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहात संधी देण्याची विनंती केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!