सोनोग्राफी मशीन खरेदी निविदा प्रक्रियेची चौकशी करावी राहुल कोल्हाटकर यांची मागणी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग वतीने शहरातील सहा रुग्णालयांकरिता सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आली आहे या मशीनच्या खरेदी निविदा प्रक्रियेची पूर्णपणे चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हाटकर यांनी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांच्याकडे केली आहे. राहुल कोलाटकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की,पालिकेच्या ६ रुग्णालयांसाठी सोनोग्राफी मशीन दाखल अशी बातमी वाचण्यात आली.सोनोग्राफी अभावी शहरातील रुग्णाची होणारी गैरसोय थांबणार आहे. सदर मशीन खरेदी केल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि वैद्यकिय विभाग यांचे मनापासून आभार..
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मध्यवर्ती भांडार विभाग यांच्या वतीने वैद्यकिय विभागाकडील नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव , आकुर्डी , सांगवी, यमुनानगर रुग्णालये आणि वायसीएम रुग्णालयाकडील भुलशास्त्र विभागासाठी Color Doppler Ultrasound Machine यांची खरेदी करण्यासाठी ई निविदा ३६/२०२४-२५ दिनांक ०९ /१०/२०२४ ते २३/१०/२०२४ या कालावधीत प्रसिध्द करण्यात आली होती. सदर निवेदेच्या प्रि – बीड मीटिंग मध्ये ज्या ठेकेदार अथवा कंपन्या सहभागी झाल्या होत्या त्यांनी सदर वस्तू खरेदी बाबत कोणत्या सूचना केल्या होत्या त्यानुसार सदर मशीन खरेदीसाठी एक प्रि- बीड अमेटमेंट अहवाल मा.आयुक्त आणि वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार केला असेल तरी सदर वस्तूचा पुरवठा हा त्याच प्रि- बीड अमेटमेंट अहवाल नुसार झाला आहे का याची पाहणी वैद्यकिय अधिकारी यांनी केली आहे का ?
वरील उल्लेख करण्यात आलेल्या Color Doppler Ultrasound Machine ह्या साहित्याची खरेदी ही त्या प्रि- बीड अमेटमेंटनुसार झाली नाही अशी शंका उपस्थीत होत असल्याने ई निविदा ३६/२०२४-२५ ने खरेदी करण्यात आलेल्या Color Doppler Ultrasound Machine यांची तपासणी करण्यात यावी आणि सदर निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन मा.श्री. डॉ.लक्ष्मण गोफने सर वैद्यकीय अधिकारी यांना करण्यात येत आहे.