spot_img
spot_img
spot_img

अलेइफिया बागसरावाला लिखित ‘टू सेंट्स’ पुस्तकाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लेखिका अलेइफिया बागसरावाला लिखित ‘टू सेंट्स : नोट्स ऑफ अ यंग विडो’ हे पुस्तक प्रेम, विरह, आत्मशोध आणि पुनर्जन्माच्या प्रवासाचे अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी चित्रण करते. सुगंध आणि कवितेच्या माध्यमातून मांडलेला हा प्रवास वैयक्तिक अनुभवांबरोबरच भारतीय समाजातील विधवांच्या स्थिती आणि परिस्थितीवरही प्रकाश टाकतो.
या पुस्तकासाठी अलेइफिया बागसरावाला यांना महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना (Foreword) सौ. मंजू लोढा यांनी लिहिली असून, त्यांच्या शब्दांनी या पुस्तकाला एक विशेष सामाजिक आणि भावनिक संदर्भ प्राप्त झाला आहे.
तसेच, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, जे अलेइफिया बागसरावाला यांचे माजी नियोक्ता आणि शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत, यांनी या पुस्तकासाठी विशेष अभिप्राय (Blurb) दिला आहे.
‘टू सेंट्स’ या पुस्तकाला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद आणि समर्थन दिले आहे. यामध्ये डॉ. फिरोज पूनावाला, उमेश फेर्वाणी, ऐमन मेहता, राबिया पटेल, अर्चना जैन, डॉ. मिकी मेहता, अभिनेत्री रिधिमा तिवारी आदी नामांकित व्यक्तींचा समावेश आहे.
हे पुस्तक केवळ वैयक्तिक भावविश्वाचा प्रवास नसून, भारतीय समाजातील विधवांच्या अनुभवांवर आधारित एक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देणारे लेखन आहे. ‘टू सेंट्स : नोट्स ऑफ अ यंग विडो’ हे पुस्तक भावनिक सशक्तीकरण, आत्मविश्वास आणि नव्या आयुष्याच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देणारे ठरत आहे.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!