spot_img
spot_img
spot_img

भोसरीत जुन्या आठवणींना उजाळा

१९७७ साली उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुन्हा चर्चा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोसरी गावाच्या इतिहासातील एक अभिमानास्पद अध्याय पुन्हा चर्चेत आला आहे. सन १९७७ मध्ये गावकऱ्यांच्या पुढाकारातून आणि स्थानिक स्मारक समितीच्या अथक प्रयत्नांतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पंचधातूचा पुतळा उभारण्यात आला होता. त्या ऐतिहासिक कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भोसरीतील मुख्य चौकात भला मोठा फ्लेक्स लावण्यात आला असून परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई येथील विलेपार्ले येथील शिल्पकार रमेश प्रभू यांच्या हस्ते साकारलेला हा पुतळा १९७७ साली मध्यवर्ती ठिकाणी स्थापित करण्यात आला आणि तेव्हापासून तो शिवभक्तांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.

त्या काळातील समिती कार्यकारिणीमध्ये आमदार हवेली श्री. सोपान तुकाराम फुगे (अध्यक्ष), श्री. लक्ष्मण गेणु शेलार (कार्याध्यक्ष), श्री. बंडु राधु फुगे (सहकार्याध्यक्ष), श्री. नामदेव वामन गव्हाणे (सेक्रेटरी), श्री. प्रकाश बंकटलाल लुंकड (सहसेक्रेटरी), श्री. त्रिंबक नाथु फुगे (खजिनदार), श्री. मच्छिंद्र गणपत फुगे (सहखजिनदार), श्री. बाळु टल्लु फुगे (सहखजिनदार), तसेच श्री. गणपत रामभाऊ फुगे (वस्ताद) व श्री. मारुती (दादा) गव्हाणे (वस्ताद) यांनी सल्लागार म्हणून मोलाचे योगदान दिले.

विशेष म्हणजे, त्या वेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आर्थिक मदत करून या उपक्रमाला हातभार लावला होता.
समस्त ग्रामस्थ भोसरी यांच्या एकजुटीने आणि योगदानाने हे स्मारक साकार झाले. आज पीएमटी चौकातील फ्लेक्समुळे जुन्या पिढीच्या आठवणींना उजाळा मिळत असून नव्या पिढीलाही गावाच्या इतिहासाची ओळख होत आहे. हा पुतळा केवळ एक स्मारक नसून भोसरीच्या एकजुटीचा आणि शिवप्रेमाचा जिवंत साक्षीदार आहे, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!