spot_img
spot_img
spot_img

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर ॲक्शन मोडवर!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथे आज विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी अचानक पाहणी दौरा करत प्रशासनाला धारेवर धरले.

या अचानक दौऱ्यात रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कोणतीही सक्षम सुरक्षा यंत्रणा नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रवेशद्वारावर येणाऱ्या नागरिकांची मेटल डिटेक्टर मशीन किंवा बॅग तपासणी यंत्राद्वारे तपासणी होत नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत स्पष्ट झाले.

भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, शहरात वाढत्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी ठोस सुरक्षा व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. सुरक्षा अभावी समाजकंटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडून रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

या गंभीर बाबी लक्षात घेता त्यांनी महापालिका आयुक्तांना तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. विशेषतः वायसीएम रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर मशीन आणि बॅग चेकिंग मशीन बसवण्याचे आदेश संबंधित विभागाला तातडीने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

“रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड चालणार नाही,” असे स्पष्ट करत भाऊसाहेब भोईर यांनी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी भूमिका मांडली. या पाहणी दौऱ्यानंतर आता महापालिका प्रशासन कोणती ठोस उपाययोजना करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!