शबनम न्यूज | प्रतिनिधी
बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी मोठी छापेमारी कारवाई करत २२ महिलांना ताब्यात घेतले. माहितीदाराकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खडक व फरासखाना पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी ११ जणींकडे भारतीय ओळखपत्रे आढळली असून त्यांची पडताळणी करण्यात आली आहे. उर्वरित ११ जणींपैकी ६ जणींनी बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले, तर ५ जणींची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली आहे.
सदर वेश्यालय सील करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


