इस्लाम हा मानवता शिकविणारा धर्म – सकल मुस्लिम समाज
पिंपरी चिंचवड : जम्मू काश्मीरच्या पहेलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 28 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झालाय, पिंपरी चिंचवड शहरातील सकल मुस्लिम बांधवांच्या वतीने मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे तसेच उद्या शुक्रवारी शहरातील मुस्लिमांनी मशिदीमध्ये मृतांसाठी प्रार्थना करावी असे आवाहन उम्मत फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे.
जम्मू कश्मीरच्या पहलगाम मध्ये अतिरेकी हल्ल्यात अनेक निष्पापांचे बळी गेले, या हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप व्यक्तींसाठी शुक्रवारी होणाऱ्या प्रत्येक मशिदी मध्ये प्रार्थना करण्याचे आवाहन उम्मत फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे. तसेच कोणताही धर्म हा हिंसा शिकवत नाही , प्रत्येक धर्मात अन्य धर्मांचा सन्मान करणे शिकविले जाते. अतिरेक्यांना कोणताही धर्म नसतो त्यामुळे आपल्या भारत देशात शांतता नांदावी यासाठी शुक्रवारच्या होणाऱ्या नमाज पठणात आपल्या देशात शांती प्रस्थापित होण्यासाठी व मृतां साठी प्रार्थना करण्याचे आवाहन उम्मत फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे..
आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो, इस्लाम धर्म हा शांततेचा पुरस्कार करता आहे,आणि अतिरेकी भ्याड हल्ला हा अत्यंत निंदनीय कृत्य कोणत्याही प्रकारे धार्मिक नाही ते मानवतेच्या विरुद्धचा गुन्हा आहे. असे सांगत सकल मुस्लिम बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.