spot_img
spot_img
spot_img

भोसरीत ६.१२० किलो गांजासह दोघे अटकेत; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोसरी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत ६ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास, भोसरी पोलिस स्टेशन हद्दीतील गोविंद गार्डनजवळील टॉवर शेजारी मोकळ्या जागेत (देवकर वस्ती, भोसरी) ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात गांजा आढळून आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
विशाल रावण मोहिते (वय २४), रा. यमाई नगर, साई पार्क, दिघी गाव, पुणे , गणेश बाबुराव थोरात (वय २४), रा. यमाई नगर, साई पार्क, दिघी गाव, पुणे यांचा समावेश आहे.

आरोपींविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई भोसरी पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक आवासाहेब माने यांच्या पथकाने केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!