शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत गांजा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणास अटक केली आहे.
या कारवाईत २१६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत १४ हजार ५०० रुपये इतकी आहे.
ही कारवाई दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास, भाटनगर, पिंपरी येथील बिल्डिंग नं. ६ जवळील रोडच्या कडेला करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात गांजा आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सनी धर्मसिंग माचकर (वय २१) असे असून तो मूळचा श्रमीकनगर, दिक्षीरोड, ओझर मिगा, ता. निफाड, जि. नाशिक येथील रहिवासी आहे. सध्या तो भाटनगर, पिंपरी येथे राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार विष्णु गौतम भारती यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.


