spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत ३ महिलांना गांजासह अटक; ४५२ ग्रॅम गांजा व मोबाइल जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पिंपरी परिसरात कारवाई करत तीन महिला आरोपींना गांजासह अटक केली आहे.

आरोपींच्या ताब्यातून ४५२ ग्रॅम वजनाचा गांजा व मोबाइल फोन असा एकूण ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास, पिंपरी पोलिस स्टेशन हद्दीतील भाटनगर येथील इमारत क्रमांक ५ समोरील मोकळ्या सार्वजनिक जागेत करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित महिलांवर नजर ठेवून त्यांची झडती घेण्यात आली असता गांजा आढळून आला.

अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी या गांजा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच त्यांनी एकमेकांच्या मदतीने गांजा कोठून व कोणाकडून आणला, याबाबत माहिती घेतली जात असून, ग्राहकांना गांजा विक्री करण्याचा त्यांचा हेतू असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी–चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलीस हवालदार गणेश बाबासाहेब कर्पे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!