शबनम न्यूज | प्रतिनिधी
बावधन पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत गांजा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणास अटक केली आहे.
आरोपीकडून ६१ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास, सहिल प्रॉपर्टीज येथील लेबर कॅम्प, केडीपी अर्धवन, महाळुंगे (पुणे) येथील रोडवर करण्यात आली.
पोलिसांनी संशयितावर नजर ठेवून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात गांजा आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद सरफुद्दीन खालिद (वय ३२) असे असून तो सध्या महाळुंगे, पुणे येथे वास्तव्यास आहे.
आरोपी मूळचा आझमनगर, जिल्हा कटिहार, बिहार येथील रहिवासी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई बावधन पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई दत्तात्रय उत्तम शिंदे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.


