शबनम न्यूज | प्रतिनिधी
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजहिताची परंपरा जपत आणि महाराजांच्या प्रेरणेतून सेवाभाव जिवंत ठेवण्याचा हा उपक्रम आहे.
हे रक्तदान शिबिर गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पार पडणार आहे. स्थळ – पालखीतील विठ्ठल मंदिरासमोर, विठ्ठलवाडी, आकुर्डी.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर भेटवस्तू म्हणून ब्लूटूथ इअरबड्स किंवा स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजक निखिल उमाकांत दळवी असून, शिवसेना युवासेना पिंपरी चिंचवड शहर उपशहर प्रमुख तसेच विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
“महाराजांच्या जयंतीनिमित्त एकच ध्यास – जीव वाचवण्याचा आणि समाजसेवेचा!” या संदेशासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन निखिल उमाकांत दळवी यांनी केले आहे.


