शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने विधवड स्टेशन परिसरात भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे, वासुदेव बळवंत फडके याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
या शोकसभेला विविध सामाजिक, राजकीय व कामगार संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात शांततेच्या वातावरणात करण्यात आली, उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळत त्यांना आदरांजली.
यावेळी बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल यांनी आपल्या मनोगतात अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले योगदान कायम स्मरणात राहील. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर राहिले आणि प्रशासन व जनतेमधील दुवा म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले, महाराष्ट्राच्या राजकारणात तसा उमटवणारे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि सामान्य जनतेच्या प्रवांसाठी सदैव कार्यरत राहिलेले महाराष्ट्राचे विश्गत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुढाला आहे. मा. अजितदादा पवार हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर निर्णयक्षमता, कामाची शिस्त, स्पष्ट भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांचे ते प्रतीक होते. सिंचन, वित्त, प्रशासन आणि विकासाच्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली. कठोर वाटणाऱ्या त्यांच्या स्वभावानाने राज्याच्या प्रगतीची तळमळ होती.
सामान्य शेतकरी, कष्टकरी, युवक आणि वंचित घटकांच्या प्रश्नाकडे त्यांनी नेहमीच गांभीर्याने पाहिले. संकटाच्या काळात तात्काळ निर्णय घेऊन दिलासा देणे, ही त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी प्रशासक, प्रभावी नेता आणि धाडसी निर्णयकर्ता गमावला आहे. आज त्यांच्या आठवणीना उजाळा देताना शब्द अपुरे पडतात. त्यांचे कार्य, त्याचा संघर्ष आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या विचारावर चालणे, त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर पुढे जाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचे स्वीय सहाय्यक आर्यन आखाडे, सनय छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव, माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, प्रदेशाध्यक्ष मनोज क्षिरसागर, महाराष्ट्र मजूर पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे, फेरीवाले पथारी संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष महेंद्र निशिगंध, पिंपरी शहर जिल्हाध्यक्ष अक्षय म्हात्रे, यांनीही आपल्या भावना व्यक्त करत अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांची आठवण करून दिली, त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सर्व वक्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई शिंदे, चिंचवड शाखा अध्यक्ष दशरथ कांबळे, प्रदेश उपाध्यक्षा कोमल शिंदे, मिलिंद सोनवणे, दिलीप खिलारे, कैलास कसबे महिला शाखा अध्यक्ष कोमल वाघमोडे गौरव कांबळे, प्रतिक चुतडमल, यांध्यासह अजितदादांवर प्रेम करणारे असख्य महिला, पुरुष, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण असून उपस्थितांनी दिवंगत नेत्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संयोजन बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याऱ्यांनी केले असून शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात ही शोकसभा संपन्न झाली.


