spot_img
spot_img
spot_img

शिवजयंतीनिमित्त हिंजवडी परिसरात वाहतूक बदल; १९ फेब्रुवारीला दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत मार्ग बंद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात शिवजयंती उत्सवानिमित्त मिरवणुका काढण्यात येणार असल्याने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेदरम्यान शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार असून, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, हिंजवडी गावठाण ते श्री शिवाजी महाराज चौक असा मिरवणूक मार्ग असणार आहे. या मिरवणुकीस सुमारे एक हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली आहे. या आदेशानुसार कस्तुरी चौक ते श्री शिवाजी महाराज चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून, मारुंजी वाय जंक्शन, मेझा-९ चौक, इंडियन ऑईल चौक, विनोदे वस्ती व जांभुळकर जिम चौक मार्गे वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच मेझा-९ चौकाकडून श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेनपैकी डावी लेन बंद ठेवून उजव्या लेनने वाहतूक सुरू राहणार आहे.

वाहतूक बदल दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहणार असून, नागरिकांनी व वाहनचालकांनी या कालावधीत पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!