spot_img
spot_img
spot_img

चाकण बसस्थानक परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर छापा; तिघांकडून १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकाजवळील अस्मागरे शिवभोजन थाळी केंद्र परिसरात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अवैध जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तिघा संशयितांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत सतीष गुलाब जोगदंड (वय ४५, रा. खंडोबा माळ, चाकण), भास्कर आरोबा भिसे (वय ५२, रा. जंबकर वस्ती, नाणेकरवाडी) आणि शांती हनुमंत पोतले (वय ३७, रा. मोहितेवाडी, ता. खेड) यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून रोख रक्कम तसेच अवैध जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!