शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री नागेश्वर विद्यालय मोशी , भागशाळा चिखली येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ प्राचार्य सानप सर उपमुख्या . नाणेकर मॅडम पर्यवेक्षिका ठोंबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विकास इन्फोटेक इन्स्टिट्यूटचे संस्थापक अण्णासाहेब लावंड सर व मोरया अकॅडमीचे संस्थापक व शाळेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक नितीन साळी सर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या पर्यवेक्षिका शामाला पंडित मॅडम होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे अण्णासाहेब लावंड सर यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवावा आणि परीक्षेमध्ये यश संपादन करावे असे आव्हान केले. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व मोरया अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक नितीन साळी सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे, जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवावा विषयांची उजळणी करून महत्त्वाची सर्व सूत्रे पाठ करावी तसेच आपले भविष्याबद्दल आपण विचार करावा आणि आयुष्यातील दहावी हा महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे असे आव्हान केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व पर्यवेक्षिका शामाला पंडित मॅडम यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवताना काही महत्त्वाच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवावा . संपूर्ण परीक्षेसाठी सुयश चिंतले . भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या . परीक्षेच्या वेळी आहार विहार, वेळेच नियोजन याकडे लक्ष देण्यास मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील नववी च्या विद्यार्थिनींनी केले.दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला सरस्वतीची मूर्ती भेट दिली . कार्यक्रम आनंदात संपन्न झाला


