spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड शहराचा विकास सर्व समाजघटकांच्या सहभागातून आणि समन्वयातून करु – महापौर रवि लांडगे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहराचा विकास सर्व समाजघटकांच्या सहभागातून आणि समन्वयातून करण्यात येईल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी केले. शहरामध्ये विकास प्रकल्प राबवताना शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता व सामाजिक सलोखा यांना प्राधान्य दिले जाईल, असे देखील ते म्हणाले.

महापौर रवि लांडगे यांचा आज महापौर कक्षात पिंपरी चिंचवड येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी कार्य व्हावे, या शुभेच्छा यावेळी महासंघाच्या वतीने देण्यात आल्या. तसेच शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना महासंघाचा सक्रिय पाठिंबा राहील, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

कार्यक्रमास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद भाऊ कुलकर्णी, सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, राजनजी बुडुख, सुदर्शन जागीरदार, रुचिरा आचार बुरले, सुषमा वैद्य, संगीता कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, मकरंद वैद्य, प्रवीण कुरबेट, राजेंद्र कुलकर्णी, दुर्वा कुलकर्णी, प्रमोद कुरबेट व पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!