spot_img
spot_img
spot_img

काळेवाडी पोलिसांची मोठी कारवाई; चैन स्नॅचिंग टोळी जेरबंद, ६.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

काळेवाडी परिसरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून काळेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत आरोपींकडून तब्बल ६,०५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या सूचनेनुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जालना जिल्ह्यातून आरोपींना अटक केली. आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र, सात दुचाकी, मोबाईल हँडसेट व खंजर असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या अटकेमुळे काळेवाडी पोलीस ठाण्यातील एकूण सात गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!