spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड विद्यापीठात “पीसीयू–फार्मौरा २०२६” चे यशस्वी आयोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी औद्योगिक दृष्टिकोन, नव उपक्रमांबाबत जागरूकता ठेवून आपण करिअर करत असलेल्या क्षेत्रातील व्यावसायिक स्पर्धेबाबत अद्ययावत राहिले पाहिजे. रोज वेगाने विकसित होणाऱ्या नवनवीन संशोधनामुळे औषधनिर्माण शास्त्रात देखील बदल घडत आहेत, ते आत्मसात करण्यासाठी “पीसीयू–फार्मौरा २०२६” हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे. यातील स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संवाद कौशल्य, सर्जनशीलता, संघभावना, विश्लेषणात्मक विचार आणि प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होईल असे प्रतिपादन पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी केले.  
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) विद्यार्थी केंद्रबिंदू मानून उपक्रम राबविले जातात. यातून त्यांना नवोपक्रम, बौद्धिक क्षमता, सर्जनशीलता आणि तांत्रिक सादरीकरणासाठी उपयोग होतो. याच उद्देशाने पुणे येथील स्कूल ऑफ फार्मसी तर्फे व पीसीयू सुश्रुत क्लबच्या सहकार्याने “पीसीयू–फार्मौरा २०२६ ट्रान्सफॉर्मिंग आयडियाज इनटू रिऍलिटी” या वार्षिक दोन दिवसीय भव्य फार्मा टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
   यावेळी स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. राजेश पाटील, पीसीयूचे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, पीसीयू कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, प्रमुख पाहुणे प्रिस्टिनो फार्मा, पुणे संचालक डॉ. स्वप्निला शिंदे, केएनलिओ कॉस्मेटिक्सच्या संचालक नम्रता धर्माधिकारी, सहाय्यक प्रा. हर्षदा पुराणिक, समन्वयक मयुरेश राऊत आदी उपस्थित होते.  
   प्रास्ताविक करताना डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले कि, या फेस्टला देशभरातून एकूण १२२ संघांनी सहभाग घेतला. यामध्ये ७ विद्यापीठे, राज्यातील २० फार्मसी महाविद्यालये, इतर राज्यातील ३ फार्मसी महाविद्यालयांचा समावेश होता. या फेस्टमध्ये ७ स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये फार्मा मेड ॲड, फार्मा ३ डी मॉडेल मेकिंग, फार्मा डिटेलिंग, मिस्ट्री मेझ फार्मा ट्रेझर हंट, इंडस्ट्री डिफाइंड प्रॉब्लेम (आयडीपी), पोस्टर प्रेझेंटेशन तसेच फार्मा व्हिडिओ मेकिंग या स्पर्धांचा समावेश होता. समारोप समारंभात विजेत्या संघांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच प्राध्यापक, समन्वयक व विद्यार्थी स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले  
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पीसीयू–फार्मौरा २०२६ च्या यशस्वी आयोजना बद्दल समन्वय समितीचे अभिनंदन केले.  

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!