शबनम न्यूज | प्रतिनिधी
आदर्श बी.एड. कॉलेज येथे नाट्य वाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ गायक, संगीतकार, गीतकार आणि कवी डॉ. दयानंद घोटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. मोहन कांबळे विराजमान होते. दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्मिता ओव्हाळ यांनी केले. सुरुवातीला अभिनव विद्यालयातील विद्यार्थी कुमार धुरी याने सादर केलेल्या सुंदर अभंगाने वातावरण भक्तिमय झाले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. सुरेखा लेंभे यांनी केले.
स्पर्धांचे परीक्षक म्हणून कवयित्री सौ. शामला पंडित, सौ. अनिता खैरे, सौ. शोभा वाडेकर, सौ. शैलजा दिवटे आणि सौ. सुरेखा सोनवणे यांनी जबाबदारी पार पाडली. पारितोषिक वितरणाचे वाचन सौ. सुरेखा सोनवणे, सौ. शारदा पानगे आणि श्री. संजय पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ. गीताभारती निमल यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहसचिव सौ. वंदना आणेकर, कार्याध्यक्ष सौ. शामला पंडित आणि सभासद श्रीमती जयश्री डोळस यांनी मोलाचे सहकार्य केले.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड येथील सुमारे पन्नास ते साठ शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. जास्तीत जास्त शिक्षकांनी संस्थेचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन अध्यक्षा सौ. स्मिता ओव्हाळ यांनी केले.
या नाट्य वाचन स्पर्धांमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध होते, त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि भविष्यातील कलाकार अशा उपक्रमांतून घडतात, असे मत व्यक्त करत उपस्थित शिक्षकांनी संस्थेचे आभार मानले.
नाट्यवाचन लहान गट-
प्रथम क्रमांक (लहानगट) अहिल्यदिवी मुलींचे हायस्कूल पुणे.
नवनगर द्वितीय क्रमांक ज्ञानप्रबोधिनी, निगडी, पुणे विद्यालय
(लहान गट)
तृतीय क्रमांक – रेणुका स्वरुप पुणे.
प्रशाला सदाशिव पेठ पेठ
(लहान गट) – विभागून
तृतीय क्रमांक → ना. दा. गकरसी कन्याशाळा, नारायण पेठ
(लहानगट) विभागून पुणे.
बॉडल उत्तेजनार्थ अभिनव विदयालय हायस्कूल, कर्वे रोड पुणे
(लहानगर) (मुले)
न्यू इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ रमणबाग प्रभाव, शनिवार पेठ, पुणे.
(लहान गट)
विद्यालय उत्तेजनार्थ हर्सटाईल वडगांव बुद्रुक, पुणे. →
(लहान गट)
उत्तम दिग्दर्शक – छोटा गट महिरप –
महिरप – भीम आरती विटणकर अभिनव विद्यावय हायस्कूप, कर्वे रोड.
छोटा गट – प्रथम
श्रीम. वर्षा पाटील एम. व्ही. एम रामचंद्र राठी (म.मा) विद्यालय, पुणे.
छोटा गट – द्वितीय
श्रीम. रुपाली चौधरी भारतीय जैन संघटना माध्य विद्यावय, पिंपरी पुणे छोटा गए- तृतीय
श्रीम. मोनिका काळे एस पी छोटा गट- उत्तेजनार्थ एम शंग्लिश मि स्कूल निगडी
मोठा गट. प्रथम क्रमांक महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर,पुणे.
द्वितीय क्रमांक कॅम्प एज्युकेशन सोसा.सायरस पूनावाला हायस्कूल.
तृतीय क्रमांक-विभागून ना.दा.ठाकरसी कन्या शाळा,नारायण पेठ, पुणे.
तृतीय क्रमांक-डी,आय.सीज इंग्लिश मीडियम स्कूल, निगडी
उत्तेजनार्थ-सेंट फेलिक्स हायस्कूल.
वर्सटायिल हायस्कूल
ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
अभिनव विद्यालय हायस्कूल, कर्वे रोड.
संहिता लेखन स्पर्धा (शिक्षक )
१. सीम राधिका राजेश देशपांडे न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे
2. श्रीम. स्वाती सूनीवकुमार चुत्तर, भारत शंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविदयालय, शिवाजीनगर, पुणे
3 श्रीम अर्चना सुखसे मॉऊन हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय, गणेशखिंड, पुणे.
४. श्रीम. जस्मिन सय्यद लक्ष्मणराव आपटे प्रशाला, पुणे.
५. श्रीम. प्रांत्रल अक्कलकोटकर ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सदाशिव पेठ, पुणे
परीक्षक
१. श्रीम. शोभा वाडेकर
२. श्रीम. शामला पंडित
3. श्रीम. अनिता खैरे
४ श्रीम, शैलजा दिवटे.
५ श्रीम. हेमांगी बोंडे
उत्तम वाचिक अभिनय –
कु. श्रेया प्रमोद भंडारे -अभिनव विव्यालय हायस्कूल, कर्वे रोड पुणे
कु. स्वराज्य धुरी – अभिनव विदयालय हायस्कूल, कर्वे रोड पुणे.
कु. पूनीत गाडगीळ – लक्ष्मणराव आपटे प्रशाला, पुणे
कु. वैभवी बिन्नीवाले – ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे.
कु. अस्मि कुलकर्णी -ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सदाशिव पेठ, पुणे.
कु. रिया आडकर – एस पी एम इंग्लिश मिडियम स्कूल, निगडी, पुणे
कु. प्रणव मुळे. – मॉडर्न हायस्कूल कनिष्ठ महाविदयालय, पुणे.


